परंडा /प्रतिनिधी : -
परंडा तालुक्यातील अनाळा ग्रा.पं.च्या सरपंचपदी सौ.अंबिका जोतीराम क्षिरसागर तर उपसरपंचपदी दादासाहेब दत्तात्रय फराटे यांची निवड करण्यात आली.दि.११ रोजी ग्रा.पं. कार्यालयात निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. सरपंचपदासाठी अंबिका जोतीराम क्षिरसागर तर उपसरपंच पदासाठी दादासाहेब दत्तात्रय फराटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आर.बी भुतेकर यांनी विजयी घोषीत केले.
यावेळी ग्रा.प.सदस्य अजित शिंदे, कल्याण शिंदे , स्वाती चव्हाण, सुनिता शिंदे, अर्चना कदम उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या ग्रा.प.निवडणूकीत भाजपा -सेना प्रणीत कालिका देवी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने ९ पैकी ७ जागेवर विजय प्राप्त केला होता.निवड जाहिर झाल्यानंतर विजयी उमेदवारांची भव्य मिरवणुक काढण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची मोठया प्रमाणात उधळण करण्यात आली.
यावेळी भाजपा नेते तथा पॅनेल प्रमुख जोतीराम क्षिरसागर, भाऊसाहेब पाटील, बिबिशन शिंदे, निशिकांत क्षिरसागर, सुग्रीव राऊत ,बाळासाहेब गिलबिले, अर्जुन शिंदे ,प्रकाश शिंदे, अशोक शिंदे, हरिभाऊ शिंदे, विष्णु चोपडे,चांगदेव चव्हाण, विनोद कदम, अशोक क्षिरसागर, साजीद शेख, हुमायून शेख, बालाजी शिंदे,ईश्वर शिंदे, जोतीराम रेवडे, सागर कदम, विशाल शिंदे, तात्यासाहेब चोबे, अप्पासाहेब पाटील, रामराजे पाटील, संजय गोडसे, रामराजे गेळे, अंबादास क्षिरसागर, अप्पाराजे वामन, दशरथ क्षिरसागर, मिठू कदम, प्रशांत क्षिरसागर, मेजर शिवाजी क्षिरसागर, हनुमंत क्षिरसागर,ईश्वर क्षिरसागर, लक्ष्मण क्षिरसागर, अंगद सातपुते, दशरथ फराटे, सुग्रीव फराटे, पप्पू फराटे,नानासाहेब पाटील, आकाश पाटील, हनुमंत जाधव, भाऊसाहेब जाधव, भारत जाधव, सोमनाथ क्षिरसागर, बालाजी चाफे, नामदेव माळी, पोपट गोडसे, आजीनाथ चव्हाण, धनंजय गोडसे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.निवड प्रक्रियेत ग्रामसेवक ओ.एम. बिराजदार, ग्रा.प.कर्मचारी भिवा चव्हाण यांनी सहकार्य केले.
