तेर/ प्रतिनिधी-

 प्राचीन तगर एकात्मिक बृहत विकास आराखडा हा .आ.राणाजगजितसिंह पाटील  यांच्या संकल्पनेतून  तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने नेरुळ, नवी मुंबई येथे तयार करण्याबाबत वास्तुविशारद यांनी २२ फेब्रुवारीला आपले सादरीकरण केले.

यावेळी पुरातत्व विभागाचे  संचालक डॉ. तेजस गर्गै  यांनी मार्गदर्शन केले.यापैकी अंतिम वास्तुविशारद यांची लवकरच निवड प्रक्रिया पूर्ण होऊन हा विकास आराखडा तयार होईल. यासाठी  पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाकडून सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे तर  तेरणा ट्रस्ट यांच्याकडून समन्वयक अधिकारी म्हणून बाळकृष्ण लामतुरे यानी काम पाहिले.यावेळी तगर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे, तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, हभप दीपक खरात  यांची उपस्थिती होती.यावेळी स्मिता कासार पाटील, योगेश कासार पाटील,तेजस्विनी अफाळे,सपना  या वास्तुविशारद यांनी या कार्यासाठी सादरीकरण केले.


 
Top