उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा मुख्य प्रतोद विधान परिषद आमदार श्री. सुजितसिंहजी ठाकूर साहेब आणि आमदार श्री राणाजगजितसिंहजी पाटील   यांच्या मार्गदर्शनात आज बुधवार दिनांक २४/०२/२०२१ रोजी प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे सकाळी १२:०० वाजता भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा बैठक आयोजित केली होती ,सदरील बैठकीस भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर संभाजी नगर, श्री बापू घडामोडे, प्रदेश उपाध्यक्ष श्री केशव दादा आंधळे, जिल्हा प्रभारी श्री देविदासजी भाऊ काळे मराठवाडा महीला प्रमुख  रजनी ताई पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष   व प्रदीप तांदळे यांची प्रमुख  उपस्थिती होती.

   कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब घडामोडे यांनी संबोधित केले.  ते बोलत असताना म्हणाले कि, भारतीय जनता पार्टीचे भविष्य हे कार्यकर्त्यांच्या हातात आहे, तसेच भाजपा मध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला मान, सन्मान  आहे. प्रत्येक पक्षाचे भविष्य, हे सर्वाना माहित आहे कि ते कोणाच्या हातात आहे पण भाजप हा एकमेव पक्ष आहे जो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे,ज्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी,पदे व  न्याय मिळतो.

याप्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, श्री रामकिसन,अनिल शिंदे, प्रमोद बचाटे, शिवाजी गवळी, छायाताई, व सन्माननिय  तालुकाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष,सरचिटणीस व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती  होती. तसेच  उस्मानाबाद जिल्ह्यातील समस्त आजी माजी ओबीसी मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top