तुळजापूर / प्रतिनिधी

 तुळजाभवानी मातेचे पुजारी  संदीप अरुणराव अमृतराव - कदम  यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या वतीने व्यवस्थापनशास्त्र विषयात पीएच. डी. पदवी  प्रदान करण्यात आली. संदीप अमृतराव-कदम हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  विद्यापीठ उपकेंद्र, उस्मानाबाद येथील व्यवस्थापन विभागाचे संचालक डाॅ. सुयोग अमृतराव कदम यांचे बंधू आहेत.

संदीप अमृतराव - कदम  यांनी  “अ क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ आयटी एम्प्लोयीज अँड देअर यूज ऑफ मॅनेजमेंट स्किल इन द प्रोफेशनल अँड पर्सनल लाईफ” या विषयाचा प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. त्यांना  डॉ. संजय अस्वले यांच्या मार्गदर्शन लाभले.  संशोधनात पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः पुणे येथील आयटी इंड्रस्टी मध्ये काम करणारे कर्मचारी व्यवस्थापन कौशल्याचा त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात कसा उपयोग करतात याचा चिकीत्सक अभ्यास करण्यात आला आहे.  संदीप अमृतराव कदम  हे मागील ९ वर्षा पासून  आय टी क्षेत्रात आहेत. बंगलोर व हैद्राबाद येथे त्यांनी कार्य केले असून. सध्या  पुणे येथील नामांकित आयटी कंपनी टी. सी. एस. मध्ये कार्यरत आहेत. संदीप अमृतराव कदम  यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केल्या बद्दल माजी उप नगराध्यक्ष  दुर्गदास अमृतराव - कदम ,  अरुणराव अमृतराव - कदम , आर.पी. काॅलेजचे प्राचार्य डॉ. जयसिंग देशमुख, प्रा. संभाजी भोसले, बिल गेट्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. अर्षद रजवी, डॉ. आनंद मुळे,  अभिजीत देशमुख,  देवा नायकल आदींनी अभिनंदन केले आहे.


 
Top