उस्मानाबाद/ प्रतिनिधी

माणुसकी हेच लेखनाची मूल्य गर्भ होय म्हणून लिहिते व्हा!  असे प्रतिपादन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी केले.

 येथील मेघमल्हार सभागृहात श्री शाहूराज घोगरे लिखित “आयुष्याच्या मैदानावर” या आत्मकथनपर ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी ते बोलत होते.  प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

यावेळी पुढे बोलताना डॉ. विजयकुमार फड म्हणाले की,  माणसाला जगताना लिहिणे आणि वाचणे किती गरजेचे आहे, तसेच वर्तमानात माणुसकीची जाणीव माणसामाणसात निर्माण होण्यासाठी लिहिते होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी  प्रा. डॉ.  चंद्रजित जाधव , माधव गरड , प्रा.डॉ.  शिवाजीराव देशमुख यांनी अपले विचार व्यक्त केले.   या वेळी अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू कुमारी सारिका काळे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  नितीन तावडे होते. कार्यक्रमाला श्री खोगरे कुटुंबीय शहरातील साहित्यिक म सा प पदाधिकारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रस्तुत पुस्तकाच्या निर्मितीसाठी व प्रकाशन सोहळा  संपन्न करण्यासाठी श्री श्रीमंत सुरवसे, श्री हनुमंत लाटे, श्री दिनकर पाटील ,श्री भालचंद्र जाधव, श्री रवी निंबाळकर, श्री विजय यादव तसेच ज्ञात-अज्ञात अनेकांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री भा.न. शेळके यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी व आभार प्रा. डॉ.  रुपेशकुमार जावळे  यांनी मानले.

 
Top