तेर / प्रतिनिधी  

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त तेर ता. उस्मानाबाद येथील महाराष्ट्र संत विद्यालयात दिनांक १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर सप्ताह सोहळ्यास सोमवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. 

प्रारंभी कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक एस. एस. बळवंतराव ,नामदेव कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एस एस बळवंतराव , एम. एन. भंडारे , जे. बी .बोराडे  , डी. डी. राऊत  , आर. एम .देवकते  , एम .एन. शितोळे , ए. एन .रणदिवे , ए. डी. राठोड , के. एस. सय्यद , एम. आय. बागवान , सुर्यकांत खटिंग ,  एस .यू .गोडगे , दिलीप पालकर ,  हरी खोटे , ए .बी. वाघेरे  , एम. एल. कांबळे , एस. बी .पाटील , सतिश भालेराव , एस .डी .घाडगे , ए. बी. नितळीकर , ए .बी .सोनटक्के , व्ही. आर .वाघमोडे , विद्या झालटे , आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top