उस्मानाबाद / प्रतिनिधी

सिटीजन फाउंडेशन आणि मोहेकर महाविद्यालयाच्यावतीने शिवजन्मोत्सवानिमित्त  प्रथमच 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. सोमवारी डिकसळ येथील मोहेकर महाविद्यालयाच्या क्रीडा संकुल मैदानावर या स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. 

ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या दरम्यान क्रीडा शिक्षक लक्ष्मण मोहिते, कळंब उपजिल्हा रुग्णलायचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, डॉ. भारत गपाठ, पत्रकार मुस्तान मिर्झा, उपप्राचार्य सतीश लोमटे, क्रीडा शिक्षक बोंदर सर, कळंब मेडिकल असोसिएशनचे प्रमोद पोते, अरविंद शिंदे, हनुमंत चौधरी, अशोक चोंदे आदी उपस्थित होते. कळंबमध्ये पहिल्यांदाच फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सिटीजन फाउंडेशनचे हे अतिशय स्तुत्य उपक्रम असून यापुढे हॉकीचे देखील सामने कळंबमध्ये ठेवण्यात यावे, असे प्रतिपादन डॉ. अशोकराव मोहेकर यांनी केले. प्राचार्य डॉ. सुनील पवार आणि लक्ष्मण मोहिते यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेसाठी मुंबई, अहमदनगर, जालना, बीड, उस्मानाबाद येथील संघांनी नाव नोंदणी केली असल्याचं संयोजकांनी सांगितलं. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजकुमार ढगे, कार्तिक इंगळे,अतुल मुंढे, आशिष चंदनशिव, आकाश कल्याणकर, शरद देशमुख, ज्ञानेश्वर नरटे आदी परिश्रम घेत आहेत. उदघटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्तान मिर्झा यांनी तर आभार लक्ष्मण मोहिते यांनी केले.

 
Top