उस्मानाबाद/ प्रतिनिधी

वाणेवाडी  (ता.उस्मानाबाद)येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिवानंद कथले मित्र परिवारच्या  वतीने शिवानंद कथले यांच्या वाढदिवसानिमित्त बसवेश्वर चरित्र पुस्तक , हॉटपॉट लंच बॉक्स , मास्क, खाऊ , व शैक्षणिक साहित्य रजिस्टर, पेन आदी शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे उपाध्यक्ष  राजाभाऊ मुंडे होते. कळंब नगरीच्या नगराध्यक्ष सौ सुवर्णाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते  सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे, गावकरी , विद्यार्थ्याना  तीन वचन साहित्य पुस्तक भेट देण्यात आले. वीरशैव जंगम मठ ट्रस्ट उस्मानाबाद चे अध्यक्ष शिवानंद कथले यांचा वाढदिवसानिमित्त   सत्कार  करण्यात आला. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सह. साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन हनुमंत भुसारे, बसवेश्वर पतसंस्था उस्मानाबादचे अध्यक्ष श्रीकांत साखरे,  कळंब शहर युवा राष्ट्रवादी काँग्रेस चे  शहराध्यक्ष सागर मुंडे, वैजिनाथ गुळवे, नाना थळकरी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.  हा कार्यक्रम कोरोणा कारणामुळे सोशल डिस्टिंग चे पालन करून  करण्यात आला. 

यावेळी सरपंच जयश्री उंबरे, उपसरपंच गोविंद उंबरे,प्रदिप घेवारे,सुभाष हिंगमिरे, पांडुरंग उंबरे महाराज, विलास उंबरे, सचिन घुटूकडे, काका साळुंखे, शिक्षक क्षिरसागर सर, पौळ सर, खडके सर मदने सर व सर्जेराव जाधव  आदी सह गावातील बहुसंख्याने नागरिक उपस्थित होते.

 
Top