तुळजापूर / प्रतिनिधी

तुळजापूर  तुळजापूर येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई उद्यानात  मकर संक्रातीच्या निमित्ताने आयोजित   महिलांसाठीच्या   हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रमास शहरातील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.  प्रथमता अश्वरुढ छञपती संभाजी महाराज पुतळ्यास माजी जि.प.उपाध्यक्षा  अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येवुन या सोहळ्यास आरंभ झाला.


 या प्रसंगी जि.प.अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, सौ.पल्लवीताई  रोचकरी, सौ.अर्चनाताई विनोद गंगणे, सौ.जयश्रीताई विजय कंदले, सौ.हेमाताई औदुंबर कदम, सौ.अश्विनीताई विशाल रोचकरी, सौ.मीनाताई सोमाजी, सौ.क्रांतीताई थिटे, सौ.उर्मिला पंडितराव जगदाळे, सौ.मंजूषाताई प्रसाद देशमाने, सौ.शारदाताई माऊली भोसले यांच्यासह तुळजापूर शहरातील प्रमुख कार्यकर्त्या व माता भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 यावेळी उपस्थित महिलांसाठी सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या वस्तूचे लकी-ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते यातील पुढीलप्रमाणे  विजेत्या महिलांना लगेच मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. चांदीचे जोडवे सौ.कविता रोचकरी, सौ.सुनीताताई साळुंके, सौ.ज्योती चंद्रकांत बनसोडे, सौ.शालूताई लाड, सौ.कुसुम देवराव घोडके, चांदीचे करंडे सौ.अलकाताई साळुंके, सौ.आशाताई झिमगडे, सौ.निर्मलाताई कदम, सौ.रोशनीताई गंजे-पाटील, सौ.रागिनी राम जाधव, पैठणीचे बक्षीस सौ.सविता राजेंद्र पवार, सोन्याच्या नथीचे बक्षीस सौ.पुजाताई मोरे, सौ.दीक्षाताई भोसले, सौ.पूनमताई किशोर काळे व सोन्याचे मनीमंगळसूत्र सौ.उषाताई चंद्रकांत जाधव यांना मिळाले. तर सोन्याचे कानातल्याचे बक्षीस विजेत्या महिलेला देण्यात आले.

 
Top