तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री.लक्ष्मी नरसिंह मंदिर परिसरात बालोद्यान करण्यात येत आहे.  याचाच एक भाग म्हणून तेर येथील भक्त अमोल कस्तुरे यांनी स्व:खर्चाने लोखंडी डबलबार बसविला आहे.त्याचे उद्घाटन तेरचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी  यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अमोल कस्तुरे,मंदिराचे पुजारी नरहरी बडवे, रोजगार सेवक विठ्ठल कोकरे, ग्रामपंचायत सदस्य रविराज चौगुले आदींची उपस्थिती होती. 

 
Top