लोहारा/प्रतिनिधी

लॉकडाऊन काळातील घरगुती व शेतीचे थकीत विज बिल माफ करण्यात यावेत व शेतकऱ्यांना 8 तास विज वेळेवर देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर, आ.राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, लातूर शहर प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुका भाजपाच्या वतीने लोहारा महावितरण कार्यालयासमोर टाळा ठोक हल्लाबोल आंदोलन दि.5 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात आले. 

 यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, पं.स. सदस्य वामन डावरे, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, प्रशांत काळे, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, कमलाकर शिरसाट, प्रविण चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, अशोक तिगाडे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top