परंडा / प्रतिनिधी : - 

परंडा भारतीय जनता पार्टीच्या वतीने लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलं माफी देण्याचे पोकळ आश्वासन देऊन आता थकीत बिलावर कारवाईचे आदेश देणा-या आघाडी सरकारच्या विरोधात महावितरण कार्यालयाला टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करुन या तुघलकी सरकारचा जाहीर निषेध शुक्रवार दि.५ रोजी करण्यात आला. 

 परंडा तालुक्यातील सर्व शेतक-यांची विनंती आहे की, मागील वर्षभरापासुन कोरोनामुळे शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे.आज पुर्ण शेती व्यावसाय कोलमडुन पडलेला आहे.आज मार्केट मध्ये कुठल्याही शेतमालाला नफा कमविण्या इतपत भाव राहिलेला नाही मध्येच अवकाळीच्या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतक-यांचे आतोनात नुकसान झालेले आहे.

 महाराष्ट्रातील महाभकास आघाडी सरकारने या संकटातील शेतक-यांना अनुदान व विमा स्वरुपातील मिळणारी मदत ही पुरेशी केलेली नाही. कुठल्याही मालाला मार्केटमध्ये भाव नाही उलट शेतक-यांच्या नावावर मते मागुन जन्मास आलेल्या दळभद्री महाभकास आघाडी सरकारने तुघलकी निर्णय घेऊन शेतीपंपास अंदाज भरघोस बिले देऊन सक्तीने वसुली चालु केलेली आहे. जे शेतकरी बील भरणार नाहीत त्यांची वीज जोडणी तोडण्याचे पाप हे सरकार करत आहे. त्या विरुध्द भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले व हल्लाबोल आंदोलन करुन सरकारच्या विरोधात घोषना देण्यात आल्या. 

 यावेळी माहराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्य सुधीर आण्णा पाटील, सतिष बप्पा देशमुख, जि. चिटणीस गणेश खरसडे, परंडा तालुकाध्यक्ष  राजकुमार पाटील, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, संकेतसिंह ठाकूर, तानाजी पाटील, दादासाहेब गुडे, बबन लिमकर, शिवाजी पाटील, उमाकांत गोरे, ब्रम्हदेव उपासे, साहेबराव पाडुळे, अरविंद रगडे, सारंग घोगरे,  बाळासाहेब गोडगे, सागर पाटील, पोपट सुरवसे, दत्ता ठाकरे, युसुफ पाठाण, सुभाष लटके आदी उपस्थित होते.

 
Top