तुळजापुर / प्रतिनिधी -
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकरणास आज दि.१० रोजी नगर विकास विभागाने मान्यता दिल्याने आता लगेच याचे टेंडर प्रक्रिया सुरु करण्यात येवुन पुतळा बसविणे व शुशोभिकरण कामास लवकरच सुरु करणार, असल्याची माहीती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली.
तसेच सुधारित प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल मंत्री एकनाथ शिंदे व यासाठी पाठपुरावा केल्या बद्दल आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे शहरवासियांच्या वतीने सचिन रोचकरी यांनी आभर मानले.
या पुतळाप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी दिनांक १८.०१.२०२१ रोजी याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात सादर केला होता. मी तुळजापूर नगरपरिषदेच्या शिष्टमंडळासह नगर विकास मंत्र्याची भेट घेवून विषयाचे महत्व अवगत केले होते व प्रस्तावास तातडीने मंजूरी देण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतरही प्रस्ताव अनेक दिवस प्रलंबित राहील्यामुळे दिनांक ०१.०२.२०२१ फेब्रुवारी पासुन आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब या प्रस्तावचा दैनंदिन पाठपुरावा करत होते. मंजुरीस वेळ होत असल्याने . शिवप्रेमींमध्ये नाराजगी पसरत असल्याचा पार्श्वभूमीवर दिनांक ११.०२.२०२१ पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता आणि आज शेवटी यास मान्यता देण्यात आली असुन हा प्रश्न शांततेने सुटल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.