शिराढोण/ प्रतिनिधी
इ.स.२०१८-१९ च्या भयानक दुष्काळात केशर आंबा व न्यू सेलार मोसंबीच्या दोन्ही बागेचे प्रचंड नुकसान झाले होते. या दोन्ही बांगा नव्या हिम्मतीने उभ्या करणाऱ्या शेतिनिष्ठ शेतकरी राजेंद्र मथूरादासजी मुंदडा यांच्या शिराढोण येथील फळबागेस महाराष्ट्र शासन माहिती जनसंपर्क संचालक गणेश रामदासे यांनी बागेची पाहणी करून मुंदडा यांचे अभिनंदन केले.
यावेळी फळबागेतील विविध यशस्वी प्रयोग, शेततळे, कॅनापी मॅनेजमेंट, खतांचे नियोजन, पाण्याचे नियोजन, कृत्रीम मल्चींग आदी विविध प्रयोगांची जनसंपर्क संचालक गणेश रामदासे यांनी पहाणी केली.