उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे, कॉलेज ऑफ एज्युकेशन या शाखेचा नामविस्तार समारंभ व कोनशीला अनावरण मोठया उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा. प्राचार्य तथा संस्था सचिव सौ. शुभांगी गावडे, तर अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष   मकरंद राजे निंबाळकर आणि विशेष उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष   नानासाहेब पाटील,   मुरलीधर गावडे, मराठवाडा विभाग प्रमुख, मा. प्राचार्य, डॉ. जयसिंगराव देशमुख आणि या महाविद्यालयाच्या प्राचार्य, डॉ.सो. सुलभा देशमुख या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. प्राचार्य तथा संस्था सचिव सो. शुभांगी गावडे यांनी संस्था सुशिलादेवी साळुखे यांच्या आठवणींना उजाळा दिला. संस्थामातेनी हालाकीच्या परिस्थीत संसार संभाळत संस्थेच्या विस्तारात अविरतपणे मोलाची साथ बापूजींना कायम दिली. आजच्या विद्यार्थीनी त्यांचा आदर्श घेवन कष्टाची तयारी ठेवावी असा संदेश दिला तर अध्यक्ष समारोप करताना नगराध्यक्ष श्री. मकरंद राजे निंबाळकर यांनी बी.एड झालेल्या तरुणांनी राजकारणात यावे असे आवाहन या प्रसंगी मा. श्री. नानासाहेब पाटील आणि मा. प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी संस्थेप्रती मनोगत व्यक्त केले.

प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सौ. सुलभा देशमुख यांनी तर आभार डॉ. एन.सी. निर्मळे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.पी.ए. कांबळे यांनी बहारदार शेलीत केले या प्रसंगी कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. आर.बी. म्हस्के, प्रा. सी.एम. गायकवाड, प्रा. डी.टी. खजूरकर, ग्रंथपाल श्रीमती एस.एस. रांगोळे, शिक्षकेत्तर कर्मचारी याच्या समवेत श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मराठवाडा विभागातील सर्व गरुदेव कार्यकर्त व विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top