उमरगा / प्रतिनिधी

 मुलीला शारीरिक, मानसिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरच्या पाच जणांविरुद्ध मंगळवारी (दि.२३) मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कर्नाटकातील गोकुळ (ता. बसवकल्याण) येथील सूर्यकांत शामण्णा मटगे यांच्या मुलीचा विवाह तालुक्यातील कवठा येथील युवराज लिंबारे यांच्याशी झाला होता. सोमवारी (दि. २२) सायंकाळी मुलगी दीपाली (२०) हिने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी मंगळवारी मुलीचे वडील सूर्यकांत उर्फ शिवराम शामण्णा मटके यांनी फिर्याद दिली असून दिपालीच्या मृत्यूला कारणीभुत असणारे कविता माधव लिंबारे (सासु), माधव लिंबारे (सासरा), लिंबराज माधव लिंबारे (दीर), अतुल माधव लिंबारे (दिर), युवराज माधव लिंबारे (नवरा) (सर्व रा कवठा ता. उमरगा) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला असून अटक केली आहे. तपास पोलिस उपनिरिक्षक शिंदे करीत आहेत.


 
Top