उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2020-21 अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयात अॅप्रेल्स-सेल्फ एम्पलॉयड टेलर, रिटेल- रिटेल सेल्स असोसिएटेड, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी-डाटा डोमेस्टिक एन्ट्री ऑपरेटर आणि इतर कोर्सचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी वयाची अट 15 ते 45 असेल.इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त, यांनी केले आहे.

  जिल्हयातील 15 ते 45 वयोगटातील इच्छुक पुरूष व महिला उमेदवारांना विविध कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी या विभागाची वेबसाईट http://kaushalya.mahaswayam.gov.inवर जाऊन होमपेजवरील न्यू मोबीलायझेशन ॲड डिमांड ॲर्गीगेझन (New- Mobilization & Demand Aggregation) या बटणावर क्लिक करून उस्मानाबाद जिल्हा आणि वरीलपैकी एका अभ्यासक्रमाची निवड करून आवश्यक ती माहिती भरावी आणि अल्पमुदतीचे अभ्यासक्रम - Short Term Skiling ही योजना निवडण्यात यावी. (महत्वाची सूचना- इच्छुक उमेदवारांची नोंदणी ही प्राथमिक स्तरावर असल्याने आणि पुढील काळात संबधित प्रशिक्षण संस्थेद्वारे आपली शैक्षणिक पात्रता व इच्छुकता तपासून आपणास यथावकाश कळविण्यात येईल)या संबंधित अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02472-222236 वर संपर्क साधावा.


 
Top