उमरगा / प्रतिनिधी-

तरूणांनी शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. माँ जिजाऊंनी बालपणी शिवाजी महाराजांवर जे संस्कार रुजवले त्या संस्कारामुळेच शिवाजी महाराज जाणता राजा होऊ शकले. प्रत्येकाच्या आई-वडीलांचे संस्कार जीवनाला वळण देतात. महापुरुषांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपण्यासाठी त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. असे आर्शिर्वचन हभप कुमारी शिवलीलाताई पाटील (बार्शीकर) यांनी मुरूम येथे आयोजित किर्तणसेवेत केले.

सोमवारी (दि.२२) रोजी शरणजी पाटील मित्र मंडळच्या वतीने शिवजयंतीचे  औचित्य साधून कै. गंगादेवी माधवराव पाटील यांच्या स्मरणार्थ कीर्तनाप्रसंगी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणल्या की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य युवकांना सतत प्रेरणादायी राहिले आहेत. शिवाजी महाराजांचे कार्य समाजाला प्रगतीकडे घेऊन जाणारे असून सामाजिक जडण घडणीमध्येही त्यांचे मोलाचे कार्य राहिले आहे. अशा महापुरुषांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपण्यासाठी त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. दर वर्षी शिवरायांची जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षी हिंदवी स्वराज स्थापन करुन एक इतिहास घडविला. सध्याच्या तरुण पिढीबाबत कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या मनोरंजनात्मक वाणीतून प्रबोधन केले. त्या म्हणल्या, की तरुण पिढीने आई वडिलांची सेवा करुन त्यांचे चांगले विचार आत्मसात करावे. दुसऱ्यासाठी जगणे पाहिजे. नागरिकांनी काळानुसार स्वतः मध्ये बदल करून आनंदी जीवन जगले पाहिजे. चांगला मित्रपरिवार निर्माण करा. कै.गंगादेवी माधवराव पाटील एक आदर्श माता म्हणून त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांची आठवण सातत्याने ठेवली पाहिजे. यावेळी सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपायाचे काटेकोर पालन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, जिप सदस्य रफिक तांबोळी, राहुल वाघ, सुधीर चव्हाण, नगरसेवक श्रीकांत बेंडकाळे, गौस शेख, देवराज संगुळगे, शिवा दुर्गे, श्रीहरी पाटील, ओमकार पाटील, उत्कर्ष गायकवाड, प्रणित गायकवाड आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन किरण गायकवाड तर आभार देवराज संगुळगे यांनी मानले.


 
Top