उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 तालुक्यातील वाघोली येथील वाघोली प्रिमीअर लिगमध्ये विनोद बाकले वॉरिअर्सने अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करून विजेते पद पटकावले आहे. तर राजकिरण वॉरिअर्स हा उपविजेता ठरला. स्पर्धेत ८ पैकी सर्वाधिक ६ सामने बाकले वॉरिअर्सने जिंकले असून विजेते पदावरही आपले नाव कोरले आहे.

वाघोली येथील अनंत महाराज मठाजवळील मैदानात क्रिकेट सामने रंगले. प्रिमीअर लिगमधील अंतिम सामना हा विनोद बाकले वारिअर्स (सारोळा) व राजकिरण वॉरिअर्स (वाघोली) या दोन संघांमध्ये मंगळवारी (दि.२) झाला. अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या सामन्यात बाकले वॉरिअर्सने उत्कृष्ट गोलदांजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षकच्या जोरावर राजकिरण वॉरिअर्सचा पराभव केला. बाकले वॉरिअर्समध्ये कर्णधार बालाजी मगर, दिनेश नळेगावकर, यशवंत कांबळे, तानाजी खडके, नरेंद्र मंडीवाल, सुरज सुलाखे, प्रशांत धनके, अमर तांबोळी, कुंडलीक भक्ते, विजय डक तर राजकिरण वॉरिअर्समध्ये कर्णधार महेश मगर, प्रणव बारकुल, राज भोरे, समाधान डक, दर्शन नेवाळे, शंकर पाटील, शुभम पवार, विशाल बाकले, किरण जाधव व पवन जाधव या खेळाडूंचा समावेश होता. विजेत्या संघास ढाल व पारितोषिक देवून गौरविण्यात येणार आहे.


 
Top