उस्मानाबाद/ प्रतिनिधी

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार असून, या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय उभारले जातील तसेच त्यातून शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, २०२४ पर्यंत माणसी ५५ लिटर पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

पळसप (ता. उस्मानाबाद) येथे वसंतराव काळे यांच्या १५ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, राज्यात दर्जेदार रस्ते तयार करण्यात येणार असून, लोकोपयोगी योजना राबविण्यावर शासनाचा भर आहे. कार्यक्रमासाठी वैजिनाथ शिंदे, प्रा. सुशीला मोराळे, डॉ. सूर्यकांत जगदाळे, एस.पी.जवळकर, शिक्षक आमदार विक्रम काळे, अनिल काळे, शुभांगी काळे, डॉ.नरेंद्र काळे, प्रा.अंकुश नाडे, गंगाधर आरडले आदींची उपस्थिती होती. मान्यवरांनी वसंतराव काळे यांच्याबद्दल आठवणी सांगितल्या. प्रास्ताविक आमदार काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण गिरी यांनी तर आभार अनिल काळे यांनी मानले. दरम्यान, यानिमित्ताने आरोग्य शिबिर घेण्यात आले. सायंकाळी हभप ज्ञानोबा माऊली डिघोळकर यांचे हरिकीर्तन झाले.


 
Top