तुळजापूर/ प्रतिनिधी:

तालुक्यातील सावरगाव येथील रहिवासी तथा सावरगाव गणाच्या पंचायत समिती सदस्य अनिता तोडकरी यांचे पती ज्ञानेश्वर राजेंद्र तोडकरी यांचे गुरुवार (दि २५) रोजी  अल्पशा  आजाराने सोलापूर  येथील खाजगी  रुग्णालयात उपचारादरम्यान  निधन झाले.  ज्ञानेश्वर उर्फ बाबा तोडकरी यांच्या आकस्मित जाण्याने सावरगाव व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी ,दोन मुले, भाऊ , भावजय,पुतणे असा परिवार आहे. 

 
Top