उस्मानाबाद / प्रतिनिधी:

परंडा येथील दरोड्याचा २४ तासात पर्दाफाश करीत आरोपीस अटक करून चोरीतील मुद्देमाल जप्त केल्याबद्दल पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी आभाराचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

परंडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व वृत्तपत्र विक्रेते सुरेश घाडगे यांच्या घरी चोरी झाली होती. पोलीस अधीक्षक रौशन, अपर पोलीस अधीक्षक संजय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीतील मुद्देमाल जप्त केला.त्याबद्दल जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक रौशन यांना आभाराचे पत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, उपनिरीक्षक पांडुरंग माने, सदानंद भुजबळ, यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार संघाचे सचिव संतोष जाधव, तालुकाध्यक्ष प्रमोद कांबळे, सुरेश घाडगे , गौतम चेडे, मल्लिकार्जुन सोनवणे, विनोद बाकले, संतोष शेटे, तुषार चव्हाण, अमजद सय्यद, अजित माळी आदींची उपस्थिती होती.


 
Top