उस्मानाबाद/ प्रतिनिधी

‘मन चंगा तो कठौती मे गंगा’ मन शुध्द असेल तर कुठेही समाधान लाभते, पापी मनाने कितीदाही अन् कोणत्याही नदीत स्नान केले तरी समाधान लाभत नाही, असे विचार सांगणाऱ्या संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आज अभिवादन करण्यात आले.

 यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार संतोष पाटील, अव्वल कारकुन नरसिंह ढवळे, गजानन नरवडे, ज्योतीराम देवकर, नागरगोजे, शेख शाकीर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top