उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने  राज्यस्तरीय कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी उस्मानाबाद जिल्हा कबड्डी असोसिएशनच्यावतीने जिल्हास्तरीय निवड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी वेगवेगळे गट तयार करण्यात आलेले आहेत. जळगाव येथे ३२ वी किशोर - किशोरी कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा दि ५ ते ८ मार्च तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे ६८ वी पुरुष - महिला कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा दि.२५ ते २७ मार्च व सांगली येथे ४७ वी कुमार - कुमारी कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा दि.४ ते ७ एप्रिल दरम्यान होणार आहेत.  तसेच उस्मानाबाद जिल्हास्तर कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र कबड्डी संघ परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने  परंडा तालुक्यातील आनाळा येथील न्यू हायस्कूल येथे किशोर - किशोरी, कुमार - कुमारी कबड्डी स्पर्धेचे दि. २१-२२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

या स्पर्धेच्या निवडीसाठी किशोर-किशोरी दि.३१ मार्च २००५ नंतर जन्म, वजन गट ५५-५५ किलो, कुमार-कुमारी दि‌.३० एप्रिल २००१ नंतरचा जन्म व वजन ७०-६५ किलो, पुरुष व महिला (खुला गट) वजन ८५-७५ किलो, शाळेचे बोनाफाईड (फोटो व त्यावर ती मुख्याध्यापकाची सही), आधार कार्ड (मूळ प्रत) कुमारसाठी (सनद) आवश्यक आहे. या कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारच्या समित्या गठीत केल्या असून या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून सम्राट माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व क्रीडा मंडळ, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व क्रीडाप्रेमींनी आपले संघ या स्पर्धेत सहभागी करावेत असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष बबनराव लोकरे, कार्याध्यक्ष लक्ष्‍मण मोहिते, सचिव महादेव साठे, कोषाध्यक्ष अमरनाथ राऊत, फुलचंद कदम, मोहन पाटील, भरत जगताप, गोपाळ येळमकर, डॉ. चाऊस, सचिन पाटील, प्रकाश औताडे यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.


 
Top