उस्मानाबाद/ प्रतिनिधी

भाजपा महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे यांच्या उपस्थिती मध्ये प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय धाराशिव येथे महिला आघाडी कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. भाजपा महिला आघाडी उस्मानाबाद नवनियुक्त पदाधिकारी यांचा  महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलत असताना त्यांनी महिला  संघटना बद्दल माहिती घेत महिलांच्या संघटन वाढीकरिता ध्येय धोरणे आणि विचारधारा यांचा प्रचार व प्रसार करून पक्ष बळकट करण्यासाठी योगदान यावे. जिल्हाध्यक्ष यांना सर्व तालुक्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच सरचिटणीस यांच्या निवडी करण्यास सांगितले.तसेच आपण काम करत असताना गरज भासल्यास आपल्यापेक्षा मोठया व्यक्तींचा सल्ला  आपल्यासाठी कधीही मोलाचा ठरत असतो.आपल्याला संघटनेमध्ये कुठलंही पद असो, आपण नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे, सरकार विविध योजना महिलांसाठी राबवते, त्या आपण लोकांपर्यंत पोहचवल्या पाहिजे. त्यामुळे संघटन वाढीस मदत होते आणि योजनाचा लाभ पण जनतेपर्यंत पोहचतो.यावेळी अर्चनाताई पाटील,तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी व्यासपीठावर  भाजपा जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, अर्चनाताई पाटील,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माधुरीताई गरड,प्रदेश कार्यकारिणी सदस्य मीनाताई सोमाजी, प्रदेश सरचिटणीस दीपालीताई मोकाशी, प्रदेश उपाध्यक्ष, उस्मानाबाद  प्रभारी स्वाती जाधव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रिदा रशीद, प्रदेश सचिव वर्षा डहाळे, आरती सतीश गिरी, सुलोचना वेदपाठक, क्रांती थिटे, अलका मगर, पूजा राठोड तसेच महिला मोर्चाच्या अनेक महिला उपस्थित होत्या

 
Top