उस्मानाबाद / प्रतिनिधी-
वीरशैव जंगम मठ ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या मालकीची उस्मानाबाद शहरात सर्व्ह नं. 18 हा संपूर्ण ( 29 एक्कर 22 गुंटे) जमीन आहे. या वर न. प. उस्मानाबाद यांनी ग्रीन झोन टाकलेले असताना या जमिनीवर बेकायदेशीर आतिक्रमण होत आहे. या संदर्भात अनेक वेळा न. प. उस्मानाबाद कडे तक्रार केलेली आहे. आनेक वेळा पाठपुरावा करूनही आजुन कोणतेही कार्यवाही झाली नाही.म्हणून लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे उपाध्यक्ष राजाभाऊ मुंडे आबा यांच्या नेतृत्वाखाली वीरशैव जंगम मठ ट्रस्ट उस्मानाबाद चे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटले. या वेळी जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण काढण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश संबधित विभागाला दिले.
या शिष्टमंडळात वीरशैव जंगम मठ ट्रस्ट चे अध्यक्ष शिवानंद कथले, सचिव श्रीकांत साखरे कोषाध्यक्ष वैजिनाथ गुळवे, दिपक आलुरे, गुरुनाथ बडूरे, अड. सुधीर तानवडे,शंकरराव कोरे, प्रफुल्लकुमार शेटे, दयानंद मडके आदींची उपस्थिती होती.
