तेर / प्रतिनिधी
महीलानी भितीच्या छायेत जगन सोडावे ,असे आवाहन राज्य समुपदेशक तुकाराम ढोरे यानी केले.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे उमेद अभियानातील प्रेरकांना आयोजित कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना ढोरे बोलत होते. यावेळी ढोरे यांनी महीलाना कौटुंबिक हिंसाचार, सामाजिक समस्या,आर्थिक सक्षमता या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आयोजन तेर प्रभागाचे समन्वयक राम अंकूलगे यांनी केले होते.सूत्रसंचलन अमर सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास गिरीश तिर्थकर, रमेश कुंभारे व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.