उस्मानाबाद / प्रतिनिधी:

 दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगांवर मात करून अधिकारी व कर्मचारी यांना सहज भेटता यावे. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागा यांच्याकडून प्रत्येक मजल्यावरती व्हील चेअरची सोय करण्यात आली आहे.

 दिव्यांग व्यक्ती त्यांच्या कामासाठी जिल्हा परिषदेमधील विविध कार्यालयामध्ये येत असतात. लिप्टपासून त्यांच्या काम असलेल्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना भेटण्यासाठी अडचण होवू नये म्हणून प्रत्येक मजल्यावरती व्हील चेअर ठेवण्यात आलेल्या आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांच्या संकल्पनेतून दिव्यांग व्यक्तींसाठी असणा-या विविध योजना,कायदे,शासन निर्णय याबाबतची माहिती व्हावी,हा या मागचा हेतू आहे.

यासाठी दिव्यांग कक्षाची निर्मीती करण्यात आलेली आहे. व्हील चेअरचे लोकार्पन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे,डॉ.विजयकुमार फड आणि अति.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.या सुविधाबाबत दिव्यांग व्यक्तींनी उपलब्ध करुन दिलेल्या सुविधाबाबत समाधान व्यक्त केले आहे.जिल्हा परिषद कार्यालयामध्ये येणा-या दिव्यांग व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी केले आहे.

 
Top