उमरगा / प्रतिनिधी

 वंचित बहुजन आघाडी प्रणित पॅनेलला मतदान करून विजयी केलेल्या सदस्याने काॅग्रेस कडे जावुन सरपंच पद मिळवुन मतदाराचा अपमान केला त्या मुळे त्याचा राजिनामा घेउन लक्ष्मी सुरेश झाकडे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात यावे  आशा  मागणीचे   दि २५ फेब्रुवारी रोजी जवळगाबेट येथील वार्ड क्र ३ च्या  मतदारानी तहसिलदार संजय पवार यांना निवेदन देउन केली आहे*

   तालुक्यातील जवळगाबेट येथील  ग्रामपंचायत निवडणुक २०२० प्रमाणे दि १५जानेवारी २०२१ मतदान झाले आहे त्या प्रमाणे गावातील दोन पॅनेल मध्ये लढत होउन एका पॅनेलचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत तर दुसऱ्या पॅनेलचे तिन उमेदवार विजयी झाले होते.

या मध्ये सरपंच पदाचे आरक्षण ए   एसी महीले साठी जाहीर झाले होते  मात्र या बहुमत असलेल्या सहा सदस्या मध्ये ए एसी महीला नसल्याने या काॅग्रेस प्रेणित पॅनेल ने वंचित बहुजन आघाडी प्रणित पॅनेलचे एका ए एसी महीला लक्ष्मी सुरेश झाकडे या सदस्याला पैसेची फुस लावुन पळवुन नेउन दि १० फेब्रुवारी रोजी सरपंच म्हणुन त्याची निवड केली आहे त्या मुळे आम्ही वार्ड क्रमांक ३ मधील मतदारांनी वंचित बहुजन आघाडी चे श्रेध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर व वंचित चे नेते रामभाऊ गायकवाड यांच्या वरती विश्र्वास ठेउन वार्ड क्र ३ मधील ए एसी महीला ,उषा रामभाऊ गायकवाड ,लक्ष्मी सुरेश झाकडे,पुरूष जागेवर ती तानाजी शिंदे यांना मतदान करून विजयी केले होते .मात्र या पैस्याच्या लालचाने लक्ष्मीबाई सुरेश झाकडे यांनी आमचा व आमच्या मतदानाचा अपमान केला आहे त्या मुळे तहसिलदार तथा निवडणुक अधिकारी उमरगा यांनी या ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मी सुरेश झाकडे यांचा राजिनामा घेउन त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे आसे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे.

लक्ष्मी सुरेश झाकडे यांनी आमच्या मताचा आदर नकरता हे निंदनीय काम केल्याने त्यांनी सदस्य पदाचा राजिनामा देउन पुन्हा सदस्य म्हणुन विजयी होऊन सरपंच व्हावे आमची कसलीही तक्रार नाही मात्र लक्ष्मी  सुरेश झाकडे यांनी राजिनामा नाही दिल्यास तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालया समोर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जवळगाबेट येथील वार्ड क्र ३ मधील मतदारांनी   तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. या वेळी वार्ड क्र ३ चे १२० मतदार  उपस्थित होते .

निवेदनावर रमेश रावण गायकवाड ,तानाजी शिंदे,उषाबाई राम गायकवाड,शिवाजी गायकवाड ,अंगद गायकवाड,व्यकट गायकवाड,दत्ता गायकवाड,अशोक गायकवाड,सुमनबाई गायकवाड,मिनाबाई गायकवाड,ललिताबाई गायकवाड ,रमाबाई गायकवाड,तेजा बाई गायकवाड,वंसत गायकवाड,तानाजी शिंदे ,संगीता शिंदे ,कमलाकर शिंदे, महानंदा शिंदे अदि १२० जनाच्या निवेदनावरती सह्या आहेत .

 
Top