उस्मानाबाद /प्रतिनिधी-
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक तथा प्रसिद्ध पत्रकार राजा माने यांनी स्थापन केलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी राजकीय कट्टाचे संपादक प्रा.सतिश मातने यांची नियुक्ती डिजीटल मिडिया संपादक-पत्रकार संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आली.ही संघटना राज्य स्तरावर नोंदणीकृत असून डिजिटल मीडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना शासकीय सेवा सवलती मिळाव्यात व त्यांना पत्रकारितेचा अधिकृत दर्जा मिळावा यासाठी ही संघटना राज्य स्तरावर कार्य करणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारिणी निवडली जाणार असून त्याची सुरुवात उस्मानाबाद येथील निवडीपासून केल्याचेही यावेळी संस्थापक प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.
प्रा.सतिश मातने हे राजकीय कट्टाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून डिजिटल मीडियामध्ये तर दहा वर्षापासून प्रिंट मिडियामध्ये सक्रिय असून त्यांनी राजकीय कट्टा या युट्युब,पोर्टल व पेजचा नावलौकिक महाराष्ट्रभर अल्पावधीतच केला आहे. या कामाची पावती म्हणून त्यांना उस्मानाबाद डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.सोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा व तालुका निहाय डिजिटल संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारिणी ही लवकरच घोषित करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रा.सतिश मातने यांनी सांगितले.