तुळजापूर / प्रतिनिधी

‘माझा गाव, सुंदर गाव’ उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी (दि.२८) तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. हा उपक्रम २२ ते २० मार्च २०२१ दरम्यान जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात राबवण्यात येणार आहे. या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त सुरेश बेदमुथा, सहायक आयुक्त रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, समाज कल्याण अधिकारी चौघुले, जिप सदस्य धीरज पाटील, शरद जमदाडे, सरपंच वैशालीताई गोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त सुरेश बेदमुथा, सहायक आयुक्त रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, समाज कल्याण अधिकारी चौघुले, जिप सदस्य धीरज पाटील, शरद जमदाडे, सरपंच वैशालीताई गोरे, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, आदर्श गाव निर्माण करण्याची तुळजापूर तालुक्यामध्ये जी प्रक्रिया आहे त्यातील अग्रेसर असलेले अपसिंगा हे गाव आहे.जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलायचा असेल आणि विकासाची कामे लोकांच्या उपयोगाची करावयाची असतील तर एकात्मिक विकास आराखडा तयार करून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवल्याशिवाय खऱ्या अर्थाने विकास होणार नाही. यावेळी उपस्थितांना उपायुक्त सुरेश बेदमुथा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, जि. प. सदस्य धीरज पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विस्तार अधिकारी भांगे, ग्रामसेवक चैतन्य गोरे, उपसरपंच दीपक सोनवणे, ग्रा.पं. सदस्य अमीर शेख, महेश पवार, अजित क्षीरसागर, संतोष गोरे, नागनाथ खोचरे, सौदागर गोरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन हनुमंत गादगे तर आभार अमीर शेख यांनी मानले.

धनादेशाचे वाटप

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते सार्वजनिक घनकचरा व्यवस्थापन कुंडीचे उद््घाटन करून कुटुंबांना कचराकुंडी, दिव्यांगांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गावात स्वच्छतेविषयी श्रमदान करण्यात आले. तसेच माझा गाव सुंदर गावअंतर्गत गावाने केलेल्या कामाचे समितीमार्फत मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्यात तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय तीन ग्रामपंचातींची निवड करून तालुका पातळीवर ग्रामपंचायतींचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहेत.

 
Top