उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 जिल्ह्यात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 50 गावांमध्ये ‘ कॅच द रेन ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या पोष्टरचे प्रकाशन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते आज करण्यात आले.

 युवा मंडळ विकास अभियानाअंतर्गत आढावा बैठक आज निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात घेण्यात आली तेव्हा या उपक्रमाची माहिती सहायक लेखा तथा कार्यक्रम अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी दिली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन युवा स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात नव्याने 104 नवीन युवा मंडळांची निर्मिती करण्यात आली असून जुन्या मंडळांना कार्यान्वीत करण्यात येत आहे.

 यावेळी खास निमंत्रित सदस्य म्हणून उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, उमरग्याचे उपविभागीय विठ्ठल उदमले, क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे, डॉ.गोसावी, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, ॲड. तेजश्री पाटील, प्रशांत मते,प्रदीप साठे, किशोर औरदे, प्रदीप खामकर, घनश्याम वाघमारे आदी उपस्थित होते.


 
Top