उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव 2021 मंडळाचे नुतन अध्यक्ष आशिष मोदाणी यांची निवड झाली असून शहरातील प्रत्येक भागातुन त्यांचा गौरव सत्कार करण्यात येत आहे . तसेच सोमवार दि. २१ रोजी सायंकाळी भीमनगर येथे नगरसेवक सिध्दार्थ दादा बनसोडे यांच्या घरी समस्त समाज बांधव यांच्या वतीने फेटा बांधून पुष्प देवुन सत्कार गौरव करण्यात आला.
सत्कार प्रसंगी आशिष ोदाणी यांनी मनोगत व्यक्त केले असता म्हणाले की महापुरुष हे ठराविक जाती धर्माचे नसतात ते सर्वांचे असतात, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महामानवांच्या जयंत्या आपण साजऱ्या करतो. जयंती, उत्सव साजरे करतांना त्यांचे विचारही अंगिकारले पाहिजे, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी अ.लतिफ अ.मजीद,नगरसेवक सिध्दार्थ दादा बनसोडे,मृत्युंजय माणिक बनसोडे,धनंजय राऊत,प्रशांत पाटील,अग्निवेश शिंदे,बागल भैय्या,अंगुल भाऊ बनसोडे,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,देवानंद एडके,रुधिर गायकवाड,सोमनाथ गायकवाड,उदयराज बनसोडे,दुष्यांत बनसोडे,प्रमोद हावळे,बालाजी माळाळे,आकाश गायकवाड,रतन बनसोडे,स्वराज जानराव अन्य इतर मान्यवर उपस्थित होते
