ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राज्यव्यापी पत्रकार संघटनेचा राज्य पत्रकारिता पुरस्कार उस्मानाबाद येथील दैनिक सुराज्य चे वृत्त संपादक पत्रकार जी.बी.राजपूत यांना जाहीर झाला आहे. दर्पण दिनी 6 जानेवारीला अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
एजेएफसी पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल यांच्यासह केंद्रीय समितीने नुकतीच या पुरस्काराची घोषणा केली आहे. पत्रकार राजपूत यांच्यासह मातृतिर्थ सिंदखेड राजा येथील ज्येष्ठ पत्रकार,दिव्य मराठीचे प्रतिनिधी दीपक नागरे,नांदेड लोकमत चे गौतम लंके ,अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार चे पत्रकार काशीम मिर्झा यांनाही यावेळी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात सर्वांग स्पर्शी सकारात्मक आणि जनजागृतीपर लिखाणा बरोबरच शोधपत्रकारिता उपेक्षित समूहांची व्यथा वृत्तपत्रातून मांडणाऱ्या पत्रकारांचा सन्मान अचलपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात केला जाणार आहे.
उस्मानाबाद येथील पत्रकार जी.बी.राजपूत यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
