थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे नेते होते असे उद्गागार शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना केले.त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून उपस्थित होत्या.
शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, संत गाडगेबाबा महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २३ जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सचिन चव्हाण, प्रा.सचिन साबळे, प्रा.डॉ.संभाजी गाते,प्रा. डॉ.अरुण खर्डे, प्रा.डॉ.कृष्णा परभणे प्रा.डॉ.बाळासाहेब राऊत, प्रा.दीपक तोडकरी,प्रा. विद्याधर नलवडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे,प्रा. डॉ.सचिन चव्हाण व प्रा.सचिन साबळे यांनी केले होते.यावेळी प्रा.विद्याधर नलवडे ,प्रा.सचिन साबळे व प्रा.डॉ.सचिन चव्हाण यांनी आपली मनोगते व्यक्त केली.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.दीपा सावळे म्हणाल्या की नेताजींच्या निस्वार्थी भावनेचा आणि देशासाठी त्यांनी केलेल्या निस्वार्थी सेवेचा सन्मान करण्यासाठी सरकारने त्यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या परी पत्रकाप्रमाणे आज महाविद्यालयांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस म्हणून कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले.
