परंडा / प्रतिनिधी : -

येथील पेशवा युवा मंच व उप- जिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विद्दमाने नगरसेवक मकरंद जोशी व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.निलोफर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

अनेक दिवसापासुन कोरोना या महाभयंकर आजाराने देश त्रस्त असताना समाजाप्रति ऋण फेडण्यासाठी पेशवा युवा मंच परंडा यांच्या वतीने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात त्यातलाच हा भाग आहे.पेशवा युवा मंचचे अध्यक्ष शुभम भातलवंडे, जीवन विद्वत,किरण वैद्य ,रवी वैद्य,जयेश विद्वत,आदित्य विद्वत ,रोहीत भोत्रेकर ,तसेच उप- जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी श्रमदान केले.


 
Top