तुळजापूर / प्रतिनिधी-

जिल्हा भारतीय बालरोग तज्ञ डॉक्टर परिषदेची नूतन जिल्हा कार्यकारणी तुळजापूर येथील बैठकीत जाहीर करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉ. अभय शहापूरकर हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. डी. एस .थिटे व सचिव डॉ. प्रशांत मोरे  यांची उपस्थिती होती. 

यावेळी सन 2021 ते 2023 या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. यात डॉ. अभय पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर  जिल्हा सचिवपदी डॉ.मकरंद बाराते यांची निवड करण्यात आली. इतर पदाधिकाऱ्यांमध्ये डॉ.सुचेता पोफळे, डॉ.प्रसाद धर्म, डॉ. आरती डंबळ, डॉ.सचिन रामढवे यांचा समावेश आहे. यावेळी डॉ. सुधीर मुळे , डॉ. सुभाष वाघमोडे यांच्यासह जिल्ह्यातील बालरोग तज्ञ  डॉक्टर उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. श्रीनिवास हंबीरे यांनी केले तर आभार डॉ. आरती डंबळ यांनी मानले. यावेळी उपस्थित मान्यवर डॉक्टरांनी नूतन कार्यकारिणी निवडीचे स्वागत करून अभिनंदनपर सत्कार केला.


 
Top