परंडा / प्रतिनिधी : - 

परंडा तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत प्रस्तापितांना मोठा धक्का बसला आहे. निकालानंतर सर्वच राजकीय पक्षाने आमचेच वर्चस्व आहे.असे करित असताना दिसून येत असून उमेदवार आमचेच जास्त निवडूण आलेचे दावे प्रति - दावे करीत आहेत.विजयी उमेदवारांचा जल्लोष तर प्रथमच वंचित बहुजन आघाडीने रोसा येथील ग्रामपंचायतीत एक हाती सत्ता घेऊनआपली ताकत दाखवून दिली आहे. तर आर पी आय गटाने ही आपली ताकत या निवडूण निकालात दाखवून दिली आहे.प्रमुख प्रक्ष शिवसेना, राष्ट्रवादी, कांग्रेस आघाडी सह भाजपाने ही जोरदार मुसंडी मारली आहे.

 तालुक्यातील मौजे रोसा येथील वंचित बहूजन आघाडी ने ७ पैकी ५ जागेवर विजय संपादन करुण एक हाती सत्ता मिळविली आहे. विजयी उमेदवारांचा येथील महात्मा फुले चौकात वंचित बहुजन आघाडी कडुन विजयी उमेदवारांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

 या वेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य तानाजी बनसोडे विजयी उमेदवार दिपक ओव्हाळ ,मधुबप्पा ओव्हाळ ,धनंजय सोनटक्के,जिल्हा महासचिव जिल्हा प्रवक्ते प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे,भाग्यवंत शिंदे,संजय शिंदे मोहन बनसोडे,दयानंद बनसोडे, रणधीर मिसाळ, किरण बनसोडे,प्रकाश ओव्हाळ,समाधान ओव्हाळ नितिन शिंदे,अंकुश दाभाडे, हरीश पवार, मधु सुरवसे,बाबासाहेब बनसोडे, तानाजी नलवडे,पप्पूओव्हाळ आदिने फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [ आठवले ] परंडा तालुका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासआठवले  यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव संजयकुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली परांडा तालुक्यात रिपब्लिकन पक्षाचा झंझावात कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. 


 
Top