डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन तरुण कार्यकर्त्यांनी धम्म चळवळ गतिमान करावी डॉ.बाबासाहेबांच्या विचारातील सर्वच आघाड्यावर आपण काम केले पाहिजे.जगात बौद्ध तत्वज्ञान श्रेष्ठ आहे.मनातील अहंकार, राग बाजूला सारून बुद्ध धम्माच्या वाटेवर चालत राहिले पाहिजे.जगभरात धम्मक्राती गतिमान होत असून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील कराळी येथील दि लॉर्ड बुद्धा रिलिनीयस अँड चॅरिटेबल ट्रस्ट च्या बौद्ध विहारात बांधण्यात आलेल्या सभामंडप व रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी दि १७ रोजी आयोजित करण्यात आला होता या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमास रिपाइंचे जनरल सेक्रेटरी राजाभाऊ सरवदे,जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हळ, ट्रस्टचे चेअरमन विलास खिल्लारे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा अस्मिता कांबळे,भन्ते धम्मदीप, धम्मसार,समज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे,कोषाध्यक्ष कैलास शिंदे, माजी आमदार दयानंद गायकवाड,एस.के.चेले,हरिष डावरे,दिलीप भालेराव, धनंजय शिंगाडे, कर्नाटक रिपाइंचे प्रभारी प्रकाश मूलभारती मिलींद कांबळे( उमापुरकर) चंद्रकांता सोनकांबळे, सुभाष सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आठवले म्हणाले की,पाकिस्तानची जनता आजही भारतावर खूप प्रेम करते बौद्ध धम्मच्या ऐतिहासिक पावन खुणा पाकिस्तान येथे आजही जिवंत आहेत.नालंदा, तक्षशिला ही प्राचीन बौद्ध विद्यापीठे देशाला दिशा देण्याचे काम करतात.सिद्धार्थ गौतमानी रोहिणी नदीचा वाद मिटविण्यासाठी गृहत्याग केला आणि जगाच्या कल्याणाच्या बुद्ध धम्माचा प्रचार केला आज जगात बुद्ध तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ ठरत आहे.आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्माचे पालन करून धम्मचक्र गतिमान करावे असे ते म्हणाले.
प्रारंभी बौद्ध विहारात जाऊन त्यानीं भगवान बुद्धाच्या मूर्तीस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.सभामंडपाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.या वेळी भन्ते धम्मदीप राजभाऊ सरवदे,अस्मिता कांबळे, कैलास शिंदे यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर कांबळे यांनी केले प्रस्तावित विलास खिलारे यांनी केले तर आभार एम.एस.सरपे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी ट्रस्ट चे संचालक डी.टी.कांबळे, फुलचंद गायकवाड, प्रमोद कांबळे, दत्ता रोंगे, राजू भालेराव, चंद्रकांत कांबळे, किरण सगर, शुभांगी कांबळे, डी.एम.कांबळे,मिलींद कांबळे, तानाजी कांबळे, आदींनी परिश्रम घेतले.
कराळीच्या बौद्ध तीर्थ क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी ३० लाखाचा निधी देणार- प्रा. कांबळे.
जिल्ह्यातील विविध धर्माच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी दिला जातो पण आपले बौद्ध तीर्थक्षेत्र जिल्ह्यात नव्हते मात्र कराळी परिसराचा बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून समावेश झाला असून हे गाव भाग्यवान आहे.या परिसराच्या विकासासाठी ३० लाखाचा निधी देणार असल्याचे त्यानीं जाहीर केले.
