उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 वैद्यकीय क्षेत्राबाबत जनतेच्या मनात असणारी विश्वासार्हता कृष्णा हॉस्पिटल ने जपावी असे मत राज्याचे आरोग्यमंत्री  राजेश टोपे यांनी व्यक्त केले  उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे डॉक्टर गोवर्धन तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत असलेल्या कृष्णा  मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कृष्णा हॉस्पिटलने राज्य शासनाच्या सुरू असलेल्या विविध योजना या जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सुद्धा सहकार्य करावं अशी अपेक्षा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बोलताना व्यक्त केली. 

राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचं थैमान चालु आहे ,त्यातच कोरोनावर लस उपलब्ध झाली आहे ही सकारात्मक बाब आसल्याचं आरोग्य मंत्री म्हणाले .कळंबसारख्या ग्रामीण भागात आसे सर्व सोईंनी युक्त हॉस्पिटल उभा केल्याबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे संपुर्ण तांबारे परीवारचे अभिनंदन केले .लवकरच राज्यात सतरा हजार जांगाची मेगाभरती करण्यात येणार आसल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगीतले यावेळी विचारपीठावर राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री मा संजय बनसोडे, उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास बाळासाहेब घाडगे पाटील धनेश्वरी शिक्षण समूहाचे प्रतापसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय मामा निंबाळकर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उस्मानाबाद जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी आप्पा कापसे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विक्रम पडवळ जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर डी के पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वडगावे ,अखील भारतीय वारकरी परिषदेचे हभप प्रकाश बोधले महाराज क्रष्णा हॉस्पिटलचे मुख्य मार्गदर्शक डॉ जी जी तांबारे, डॉ अभिजित तांबारे, डॉ अविनाश तांबारे ,डा भगवंत जाधवर, डा राजेंद्र बावळे,डॉ रमेश वाघ आदी मान्यवर  उपस्थित होते. 

 
Top