मराठा सेवा संघ प्रणीत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र जिल्हा उस्मानाबाद यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ कर्तुत्वान महिला पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.१७ रोजी परंडा येथील महात्मा गांधी विद्यालय येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे हे उपस्थित होते.तर व्यासपीठावर जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.राहुल देशमुख, उपजिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे, जिजाऊ ब्रिगेड उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष किरण निंबाळकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष आशा मोरजकर, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष गोरख मोरजकर, ज्येष्ठ साहित्यिक तु.दा. गंगावणे उपस्थित होते .कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व नंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली.
या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी विनया महेश निंबाळकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तर शीतल लेकुरवाळे यांना राजमाता जिजाऊ प्रशासकीय सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कमलाताई नलावडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.शांता जाधवर गिते यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अध्यापक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर किरण ताई देशमाने यांना राजमाता जिजाऊ उद्योजगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सर्व पुरस्कार प्राप्त यशस्वी महिलांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,शाल व बुके देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड परांडा यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे आयोजन जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.राहुल देशमुख ,उपजिल्हाध्यक्ष डॉ.शहाजी चंदनशिवे ,जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.विशाल जाधव ,जिल्हा सचिव डॉ. नितीन पडवळ व जिल्हा कोषाध्यक्ष डॉ.श्रीकांत भोसले यांनी केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉ. राहुल देशमुख यांनी केले.सर्व सत्कार मूर्तींनी आपल्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यामध्ये किरण देशमाने, गीता जाधवर ,शीतल लेकुरवाळे, विनया निंबाळकर ,कमलाताई नलावडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
तसेच या प्रसंगी कु.जेतवणी रणधीर मिसाळ या विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील शैक्षणिक सामाजिक कार्यामध्ये काम करणारे प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन साहित्य परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले.
