उमरगा / प्रतिनिधी- 

 येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेचा व कराळी येथील बुद्धविहार परिसरातील सभागृह व रस्त्याच्या लोकार्पनाचा उद्घाटन सोहळा रविवारी १७ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास.केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते  संपन्न होत आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्य मंत्री संजय बनसोडे आहेत.  कार्यक्रमास तालुक्यातील जनतेनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी दि १४ रोजी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे,सामाजिक कार्यकर्ते धनंजय नाना शिंगाडे,बाबासाहेब कदम, सिद्धार्थ सोनवणे,नीलकंठ सूर्यवंशी, अजित पाटील, आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की,महाराष्ट्र व कर्नाटकातील बौद्ध जनतेला या विहाराच्या माध्यमातून धम्म संस्कार रुजविण्यासाठी मदत होत आहे.दोन कोटी रुपये खर्चून या विहाराचे काम करण्यात आले असून ८०टक्के काम पूर्ण झाले आहे.उर्वरित काम अंतिम टप्यात असून तालुक्यातील जनतेला  हे श्रद्धेचे ठिकाण आहे.या सोहळ्याला आमदार शरद रणपिसे, सुजितसिंह ठाकूर, राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार, माजी बांधकाम सभापती अडँ अभयसिंह चालुक्य,विरोधी पक्ष नेते शरण पाटील, युवा नेते किरण गायकवाड, समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे,हरिष डावरे,एस.के.चेले.माजी नगराध्यक्ष सौ शालिनी सरपे,माजी आमदार दयानंद गायकवाड, दिलीप भालेराव, सुभाष सोनकांबळे, रामभाऊ गायकवाड, विजय वाघमारे,कमलाकर सूर्यवंशी, गौतम कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे.कार्यक्रमास दि लॉर्ड बुद्धा रिलिनीयस अँड चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विलास खिल्लारे,उपाध्यक्ष मत्सेन्द्र सरपे,व महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक परिश्रम घेत आहेत.

 
Top