तुळजापूर / प्रतिनिधी- 

तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा असलेल्या मंगरुळ ग्रामपंचायतची निवडणुकीत  महाविकासआघाडी व भाजपाप्रणितआघाडी कडुन सर्वसाधारणस्ञीप्रवर्गातुन ऐक ऐक महिला उमेदवार विजयी झाल्याने यात महाविकासआघाडी आघाडी च्या सदस्य सरपंच पदी विराजमान होण्याची मोठी शक्यता आहे. यात महाविकासआघाडी कडून जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे यांची भगिनी विजयालक्षमी महेश डोंगरे यांची उमेदवारी निश्चित असुन त्या मंगरुळ गावचा सरपंच पदी विराजमान होण्याची मोठी शक्यता आहे.

 मंगरुळ येथ  नुकतीच ग्रामपंचायत निवडणुक अतिशय चुरशीची व अटीतटीची होवुन यात महाविकासआघाडी सहा व भाजपा प्रणित आघाडीला पाच जागा मिळाला आहेत सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारणस्ञीप्रवर्गास सुटले असुन या प्रवर्गातुन महिविकासआघाडी कडून  जिपसदस्य महेंद्र धुरगुडे यांच्या भगिनी विजयालक्षमी महेश डोंगरे विजयी झाल्याने त्यांची सरपंच पदाची उमेदवारी निश्चित मानले जात असुन महाविकासआघाडी कडे बहुमत असल्याने त्या सरपंच पदी विराजमान होण्याची मोठी शक्यता आहे.

विरोधी भाजपा प्रणित महाविकासआघाडी तुन सर्वसाधारणस्ञीप्रवर्गातुन लबडे विजयी झाल्या असुन त्यामुळे पदाची निवडणुक मतदान होवुन कि बिनविरोध होणार याकडे मंगरुळ ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत मंगरुळ येथे काँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस शिवसेना यांनी ऐकञित येवुन भाजपा प्रणित आघाडीला रोखण्याचे मोठे प्रयत्न केले तरी भाजपा चे प्रतापसिंह व चित्तरंजन सरडे या बंधुनी तिन्ही पक्षाशी लढत दिली व अकरा पैकी पाच जागा जिंकुन आपले अस्तित्व सिध्द केले.

 
Top