उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

गेल्या अनेक वर्षांपासूनची वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीबाबत राज्य सरकार ने तत्परता दाखवत २७ जानेवारी रोजी वैद्यकीय महाविद्यालयाबाबत तपसील जाहीर करत जीआर काढला आहे. यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्याबरोबरच अामदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचेही प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत.  विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या मतानुसार प्रायव्हेट पार्टनर व सरकार अशा पार्टनरशीप मध्ये वैद्यकीय महाविद्यालय काढण्याची कल्पना होती. परंतू यास आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार विरोध केल्यामुळेच आघाडी सरकार ने पुर्णपणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजूरी दिली. 

उस्मानाबादेत १०० विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यास संलग्नीत जिल्हा सामान्य रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ४३० रूग्ण खाटाचे रूग्णालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. अंदाजपत्रीय तरतूद करून विहित मार्गाने विविध संवर्गातील पदे निर्माण करण्यास व भरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. यंत्र सामुग्री, देखभाल, बांधकाम, पद निर्मती, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांनुसार आवर्ती खर्च व बाह्यस्त्रोत खर्च यासाठी ६७४ कोटी १४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४ वर्षांचा अंदाजित खर्च ९७ कोटी ६० लाख रुपये व ४४८ पदांना आवश्यकता नुसार मान्यता देण्यात आली आहे. तर रूग्णांलयासाठी ९८६ पदांना मान्यता देऊन १०० कोटी ५७ लाख रुपये अंदाजीत खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. महाविद्यालय व रूग्णांलयाकरिता ६० हजार २४२ चौरस मीटर बांधकामासाठी ४ वर्षांसाठी ३०९ कोटी ६३ लाख रुपये मान्यता देण्यात आलेली आहे. महाविद्यालय व रूग्णालय स्थापनेच्या एकुण ४ वर्षांचा खर्च ६७४ कोटी १४ लाख या प्रमाणे येणार आहे. अामदार कैलास पाटील यांना वैद्यकीय महाविद्यालयाचा पाठपुरावा करता-करता भोवळ आल्याच्या ही बातम्या व्हायरल झाल्या होत्या. भाजपा सरकारच्या काळात सुजितसिंह ठाकूर यांनी पोटतिडकीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधान परिषदेध्ये आक्रमकपणे भाषण केले होते. तर राणाजगजितसिंह पाटील यांनी पण प्रयत्न केला होता.परंतू तत्कालीन भाजपा सरकार ने उस्मानाबादकरांना केवळ आश्वासनावर आश्वासनच दिले. 

तातडीने सुरू करण्याचा प्रयत्न 

शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी लोकराज्यशी बोलताना सांगितले की, येत्या शैक्षणीक वर्षांपासून हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्यासाठी आम्हाला यश मिळाले असलेतरी यामध्ये सर्वांचा वाटा असल्याचे ही त्यांनी नम्रपणे कबुल केले. 

 
Top