वाशी/ प्रतिनिधी

वाशी तालुक्यातील लक्षवेदी ठरलेल्या तेरखेडा ग्रामपंचायतीवर परत एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस ने बाजी मारली आहे.तेरखेडा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी ह्यांनी एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले होते.त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच चुरशीच्या होणार असल्याचे बोलले जात होते.मात्र निकाल हा एकहाती राष्ट्रवादी च्या बाजूने लागुण ग्रामविकास आघाडी चे सर्वच्या सर्व उमेद्वार विजयी झाले आहेत.

वाशी तालुक्यातील इंदापूर ग्रामपंचायत वीस वर्षे  रमेश गपाट(पाटील) यांच्या ताब्यात होती .यांच्या सर्व पँनेलला पराजयाचा सामना करावा लागला असून शिवसेना तालुकाप्रमुख सत्यवान गपाट यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतर झाले.तसेच बावी ग्रामपंचायतीच्या 11 जागापैकी 8 जागेवर भाजपप्रणीत पॅनेलने विजय मिळवून प्रस्थापीत पँनेलचे शामराव शिंदे यांना 3 जागेवर समाधान मानावे लागले.तसेच  वाशी तालुक्यामध्ये झालेल्या निवडणुकीत 34 ग्रामपंचातीपैकी सारोळा(वाशी)ही ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच ग्रामपंचायतीच् नक्की कोणत्या पक्षाची आहे हे दिसून येईल.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार नरसिंग जाधव व नायब तहसीलदार भालचंद्र यादव,नायब तहसिलदार स्नेहलता पाटील,सुजाता हंकारे  ,अव्वल कारकून सचिन पाटील व त्यांचे सहकारी विरभद्र स्वामी ,विनोद तळेकर  त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी काम पाहिले.पोलीस निरीक्षक उस्मान शेख  यांनी तहसील कार्यालय येथे मतमोजणी च्या वेळी परिसरात  चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.तहसिलच्या आवारात विजयी उमेदवारांनी  गुलालाची  उधळण करीत जल्लोष साजरा केला.


 
Top