उस्मानाबाद तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी, भाजप, वंचत बहुजन आघाडी तर कांही ठिकाणी काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढली असली तरी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपल्याला पक्षाला यश मिळाल्याचा दावा केला जात आहे.
१५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर १८ जानेवारी रोजी सकाळी पॉलीटेकनीक कॉलेज येथे मतमाजेणी झाली. 20 टेबलावर चार फेऱ्यामध्ये ही मतमोजणी संपन्न झाली. यामध्ये आरणी ग्रामपंचायत व वाणेवाडी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे ९ व ८ उमेदवार निवडून आले आहेत. तर दाऊतपूर ग्रामपंचायतमध्ये सर्वपक्षीय पॅनलचे ५ उमेदवार, बीजेपीचे २ व शिवसेनेचे २ उमेदवार निवडुण आल्याचा दावा करण्यात आला आहे. वडगाव सिध्देश्वर मध्ये शिवसेना काँग्रेसचे युतीचे ७ उमेदवार विजयी तर बिजेपीचे ४ उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे शिवसेनेचे पॅनलप्रमुख अंकुश मोरे मात्र पराभूत झाले. खासदार ओमराजे यांच्या गोवर्धनवाडीत खासदार पॅनलचे ९ पैकी ६ जागा जिंकून सत्ता राखली आहे. ३ जागेवर भाजपाने िवजयी झाली आहे. सांजा ग्रामपंचायतमध्ये श्रीराम बापू पॅनला तीन जागेवर समाधान मानावे लागले. तर सांजा जोगेश्वरी विकास पॅनलने १२ जागेवर विजय पटकावला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाची निवडणुक आरक्षण काढल्यानंतर होणार असून ज्या पक्षाचा सरपंच होईल. त्याच पक्षाच्या ताब्यात ग्रामपंचायत असेल, असे बोलले जात आहे.
