उस्मानाबाद / प्रतिनिधी-
केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत Prime Minister Formalisation of Micro Food Processing Enterprises (PMFME) ही केंद्र पुरस्कृत योजना देशभरामध्ये राबविण्याचे नियोजन केलेले आहे. यासाठी 10 हजार कोटीचा रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
या योजनेमध्ये केंद्राचा 60 टक्के तर राज्यांचा 40 टक्के हिस्सा असणार आहे. यामध्ये सध्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या सूक्ष्म उद्योगांचे आधुनिकीकरण करून त्यांना संघटीत क्षेत्रामध्ये रुपांतरीत करणे. शेतकरी उत्पादक संस्था (FPO), बचत गट (SHG), सहकारी संस्था यांना सार्वजनिक पायाभूत सुविधा, मूल्यवर्धन, बॅकवर्ड- फॉरवर्ड लिंकेज, ब्रँडींग व बाजारपेठ सुविधेकरिता योजनेंतर्गत पॅकेज उपलब्ध करुन देणे आदी उद्देश आहेत. जिल्हयातील कृषि व अन्न प्रक्रियाशी संबंधित असलेल्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सामाईक पायाभूत सुविधा पुरविणे आदी करीता क्रेडीट लिंकव्दारे बँक कर्जाशी निगडीत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) हे धोरण स्वीकारले जाणार आहे,त्यामुळे मुल्यसाखळी विकास आणि पायाभुत सुविधांची उभारणी करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहेत.
या योजनेअंतर्गत सद्यस्थितीत शेतकरी उत्पादक संस्था/शेतकरी उत्पादक कंपनी/स्वयंसहाय्यता गट/सहकारी संस्था यांना सार्वजनिक पायाभूत सुविधा,मुल्यवर्धन,फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेज,कॅपीटल इनव्हेसमेंट आदी करीता प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के निधी आणि ब्रँडींग व बाजारपेठ सुविधेकरीता प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान निधी क्रेडीट लिंकड कॅपीटल सबसीडी या आधारावर अनुज्ञेय राहील आणि प्रशिक्षण सुविधा खर्चाच्या 100 टक्के अनुदानानुसार उपल्बध करुन देण्यात येईल. तसेच स्वयंसहाय्यता बचत गट-खेळते भांडवल व छोटया औजारे खरेदीकरीता अन्नप्रक्रीया उद्योगाशी संबंधित कमाल 10 सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणूक /भांडवल म्हणून फेडरेशन मार्फत कमाल 40 हजार प्रती सदस्य अनुज्ञेय राहील. तसेच प्रस्ताव एक जिल्हा एक उत्पादन धोरणानुसार निश्चित केलेल्या (पिक-1. हरभरा 2.कांदा 3.सोयाबीन) उत्पादनाशी संबधीत असावा.
या योजनेकरीता सद्यस्थितीत शेतकरी उत्पादक संस्था/शेतकरी उत्पादक कंपनी /स्वयंसहाय्यता गट /सहकारी संस्था,यांच्या मार्फत ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद फोन- 02472-227118 सपंर्क करावा.वेबसाईट- www.molpi.nic.in व pmirne या वेबसाईद्रला भेट द्या.