उमरगा/ प्रतिनिधी

 तालुक्यातील बेटजवळगा येथील दलित समाजातील शेतकऱ्यांना शेतरस्ता खुला करून देण्याच्या मागनीसाठी दलित महासंघाचे वतीने शनिवारी दि २२ पासून राजाभाऊ शिंदे व शेतकऱ्यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन चालू केले आहे.

तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले असुन त्यात असे म्हटले आहे की,बेटजवळगा येथील सर्वे नंबर २२९,३०,३१,३३,३४ मध्ये जाणे येणे करण्यासाठी ६० ते ७० वर्षापासून रस्ता चालू होता गावातील कांही गुंड प्रवृत्ती च्या लोकांनी सदरचा रस्ता बंद करून शेतकऱ्यांना मज्जाव करीत आहेत.या बाबतीत तहसीलदार याच्याकडे दाद मागीतल्यानंतर तहसीलदार यांनी न्याय दिला असून त्याप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कडे सदरील रस्ता खुला करून मिळणेस अर्ज दिलेला आहे.त्यानंतर महसूल विभागाचे मंडळ आधिकारी, तलाठी,आणि इतर महसूल कर्मचारी रस्ता खुला करून देण्यासाठी दि १९ जानेवारीत रोजी सकाळी संबंधित रस्त्यावर आले त्या वेळी रस्त्याच्या लगत असलेले गैर अर्जदार शेतकरी यांनी सदरील रस्ता खुला करून देत असताना प्रशासकीय अधिकारी यांना विरोध करून रस्ता खुला करून देण्याला विरोध केला आहे.अर्जदार शेतकऱ्यांनी एसीपींना पोलीस संरक्षण मिळावे म्हणून अर्ज दिलेला असताना रस्ता खुला करते वेळी पोलीस संरक्षण मिळाले नसल्याने तसेच उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार यांना जावक क्रमांक २०२०/मह/ जमा/ कार्या/४ - कावी दि ३० सप्टेंबर रोजी विना विलंब करता सदरील रस्ता खुला करून घ्यावा असे आदेश दिलेले असून ही यांची दखल घेतली नसल्याने तहसील कार्यलया समोर बेमुदत धरणें आंदोलन सुरू केले आहे या निवेदनावर दलित महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ शिंदे शेतकरी व्यंकट मारुती शिंदे,तानाजी किसन शिंदे,कमलाकर राम शिंदे,बाबू शिवराम शिंदे आदींच्या सह्या आहेत. 

 
Top