उस्मानाबाद / प्रतिनिधी  -  

येथील नेहरू युवा केंद्राची जिल्हा सल्ला समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक धनंजय काळे, रामचंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आलेल्या सदस्य समितीचा कालावधी तीन वर्षांचा आहे. 

समितीमध्ये कै. व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. प्रशांत चाैधरी, तुळजापूर तालुका क्रीडाधिकारी सारीका काळे, उस्मानाबाद स्पोर्ट्स अकॅडमीचे सदस्य प्रदिप खामकर, तेजस्विनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड. तेजश्री पाटील, एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिलाष लोमटे, विवेकानंद युवा मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, श्री छत्रपती शिवाजी बहुउद्देशिय संस्था एकूरगावाडी ता. उमरगाचे अध्यक्ष किशोर औरादे, भूम येथील प्रदिप साठे, नेहरू युवा केंद्राचे माजी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशांत मते, नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक घनश्याम वाघमारे यांचा समावेश आहे.

नवनियुक्त सदस्यांचा नेहरू युवा केंद्राचे धनंजय काळे, रामचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रविकांत सुरवसे, वैभव लांडगे यांच्यासह नेहरू युवा केंद्राचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top