उस्मानाबाद / प्रतिनिधी  -  

तालुक्यातील झरेगाव येथे याराना क्रिकेट क्लबच्यावतीने हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, ट्रॉफीचे वितरण दि.१९ जानेवारी रोजी करण्यात आले.

उस्मानाबाद तालुक्यातील झरेगाव याराना क्रिकेट क्लबच्यावतीने संयोजक विजय तांबे, विकास सोनवणे, अनिकेत ढोकळे, सागर एडके व धनाजी सोनवणे यांनी हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या क्रिकेट स्पर्धेत ३५ क्रिकेट संघानी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील जय भवानी क्रिकेट संघाने प्रथम तर झरेगाव येथील याराना क्रिकेट क्लबने दुसरा व बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील संभाजीनगर क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. या विजेत्या संघांना अनुक्रमे  ७ हजार ७७७ रुपये, ५ हजार ५५५ रुपये व ३ हजार ३३३ रुपये रोख रक्कम व ट्रॉफीचे वितरण फुलचंद धर्मे, सदाशिव सोनवणे, अमोल देशपांडे, तानाजी ढोकळे, शंकर धर्मे, ज्ञानेश्वर ढोकळे, विजय सोनवणे यांच्या हस्ते  करण्यात आले.

 
Top